E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
धावपट्टी विस्तारीकरणाला येणार वेग
Samruddhi Dhayagude
09 Apr 2025
मंत्री मोहोळ यांचे निर्देश; मोठ्या आकाराच्या विमानांचेही होणार उड्डाण
पुणे : लोहगाव येथील विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढावी आणि मोठ्या आकाराच्या विमानांना ये-जा करता यावे, यासाठी आवश्यक असणार्या धावपट्टी विस्तारीकरणाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही वेग येणार आहे. हे काम ’फास्टट्रॅक’वर करण्याचे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या बैठकीत दिले. तसेच यात लोहगावकडे जाणार्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून पुणे महापालिका हवाई दलाशी समन्वय साधून हा रस्ता करणार आहे.
काहीच दिवसांपूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाला परवानगी मिळाली होती. त्यानंतर विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारे भूसंपादन, लोहगावचा पर्यायी रस्ता करणे आणि इतर तांत्रिक बाबी याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक बोलावून विविध निर्देश दिले. या बैठकीला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विमानतळाचे संचालक संतोष ढोके, हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह आदी उपस्थित होते. या बैठकीत धावपट्टी विस्तारीकरण ’फास्टट्रॅक’वर करण्याचे निर्देश देऊन इतर बाबींचाही मोहोळ यांनी आढावा घेतला.
मोहोळ म्हणाले, पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सैन्य दलाची आणि खासगी जागा प्रत्यक्षात किती लागणार आहे? याबाबत चर्चा केली. शिवाय हवाई दलाची विमानतळासाठी आवश्यक असणारी जागा ही विमानतळ प्राधिकरणाला मिळावी, या मागणीचा प्रस्ताव सैन्य दलाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. हवाई दलाच्या या जागेत विमानतळाच्या व्यवस्थापनासंदर्भात यंत्रणा उभी करणे शक्य होणार आहे. तसेच या बदल्यात विमानतळ प्राधिकरणाकडून हवाई दलाला पर्यायी जागा देण्यात येणार आहे. याबाबतच्या आस्थापनेचा खर्च विमानतळ प्राधिकरणाकडून केला जाणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे धावपट्टी विस्तारणीकरणामुळे विश्रांतवाडी ते लोहगाव हा विमानतळालगत असणारा रस्ता बाधित होणार असल्याने त्याला तातडीने पर्यायी मार्ग तयार करावा लागणार आहे. हा नियोजित पर्यायी रस्ता हवाई दलाच्या जागेतून जाणार आहे. या रस्त्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि या पर्यायी रस्त्याचा खर्च पुणे महापालिका करणार आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणे आवश्यक
पुणे आणि परिसराची तातडीची गरज लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच ही सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विस्तारासाठीचे भूसंपादन राज्य सरकारकडून वेगाने केले जाणार आहे, मात्र त्यासाठीची पूर्व पूर्तताही वेळेत होणे गरजेचे आहे. म्हणूनच या बैठकीत सविस्तर आढावा घेत वेगवेगळे निर्देश दिले आहेत.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
Related
Articles
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!
12 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
काकांना विश्वासात घ्यावेच लागते...
14 Apr 2025
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप
14 Apr 2025
तेजस्वी यांनी घेतली खर्गे, राहुल यांची भेट
16 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!
12 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
काकांना विश्वासात घ्यावेच लागते...
14 Apr 2025
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप
14 Apr 2025
तेजस्वी यांनी घेतली खर्गे, राहुल यांची भेट
16 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!
12 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
काकांना विश्वासात घ्यावेच लागते...
14 Apr 2025
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप
14 Apr 2025
तेजस्वी यांनी घेतली खर्गे, राहुल यांची भेट
16 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
टार्गेट पूर्ण; कामगारांना एसयूव्ही गिफ्ट!
12 Apr 2025
घाऊक महागाई दर २.०२ टक्के
16 Apr 2025
काकांना विश्वासात घ्यावेच लागते...
14 Apr 2025
पाण्याच्या टँकरच्या पळवापळवीला बसणार चाप
14 Apr 2025
तेजस्वी यांनी घेतली खर्गे, राहुल यांची भेट
16 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार